Posts

Showing posts from September, 2020

कोरोना .....जीवन संघर्ष

 वर वर कोरोना एक गमतीशीर नाव वाटते पण आज सगळे विश्व त्याच्या विळख्यात अडकले आहे .सुरुवातीला परदेशी वाटणारा हा पाहुणा कधी घराचा सदस्य झाला कळलेच नाही .पाश्चिमात्य देशांना लोळवून आज हा भा रताला पछाडू पाहत आहे .याने भारताचे राजकारण ,अर्थकारण ,समाजकारण सग्गळ काही कोलमडून ठेवले आहे .फार दूरगामी परिणाम आपल्या एकूणच सर्व आघाड्यांवर याने केले आहेत .भारतीय मनांवर अधिराज्ये गाजवणार्या काही गोष्टींची धुंदी या कोरोना ने उतरवली आहे उदा .बॉलीवूड ,क्रिकेट ,टिक टोक ,ऑनलाईन शॉपिंग ,राजसी जीवन ,एकूणच सर्व माज छान उतरला आपला .प्रगतीच्या वारे एवढे कानात शिरले होते कि आपण माणूस नसून सर्वज्ञ आहोत असेच जणू आपल्याला वाटत होते .पण म्हणतात न ,शेरास सव्वाशेर ......मिळतोच कधीतरी .आणी तो योग २०२० ने दिला आणि स्वतःची बदनामी करवून घेतली .माणूस प्रयोग शाळेत जीवशास्त्राच्या मानगुटावर जाऊन बसला होता ,कृत्रिम गर्भधारणा ,क्लोन ,अवयव प्रत्यारोपण .....इथपर्यंत ठीक होतं .सौंदर्य वाढवण्यासाठी व निसर्ग विरोधी काही चुकीच्या गोष्टी त्याने प्रचलनात आणल्या होत्या ....सगळच  शक्य वाटू लागले ,अशक्य हा शब्दच संग्रही उरला नाह...