कोरोना .....जीवन संघर्ष

 वर वर कोरोना एक गमतीशीर नाव वाटते पण आज सगळे विश्व त्याच्या विळख्यात अडकले आहे .सुरुवातीला परदेशी वाटणारा हा पाहुणा कधी घराचा सदस्य झाला कळलेच नाही .पाश्चिमात्य देशांना लोळवून आज हा भा रताला पछाडू पाहत आहे .याने भारताचे राजकारण ,अर्थकारण ,समाजकारण सग्गळ काही कोलमडून ठेवले आहे .फार दूरगामी परिणाम आपल्या एकूणच सर्व आघाड्यांवर याने केले आहेत .भारतीय मनांवर अधिराज्ये गाजवणार्या काही गोष्टींची धुंदी या कोरोना ने उतरवली आहे उदा .बॉलीवूड ,क्रिकेट ,टिक टोक ,ऑनलाईन शॉपिंग ,राजसी जीवन ,एकूणच सर्व माज छान उतरला आपला .प्रगतीच्या वारे एवढे कानात शिरले होते कि आपण माणूस नसून सर्वज्ञ आहोत असेच जणू आपल्याला वाटत होते .पण म्हणतात न ,शेरास सव्वाशेर ......मिळतोच कधीतरी .आणी तो योग २०२० ने दिला आणि स्वतःची बदनामी करवून घेतली .माणूस प्रयोग शाळेत जीवशास्त्राच्या मानगुटावर जाऊन बसला होता ,कृत्रिम गर्भधारणा ,क्लोन ,अवयव प्रत्यारोपण .....इथपर्यंत ठीक होतं .सौंदर्य वाढवण्यासाठी व निसर्ग विरोधी काही चुकीच्या गोष्टी त्याने प्रचलनात आणल्या होत्या ....सगळच  शक्य वाटू लागले ,अशक्य हा शब्दच संग्रही उरला नाही ,किंवा हा शब्द शिवीच होऊन बसला .बेफाम वेग प्रगतीला आला .माणूस प्रत्येक क्षणाला नवा होऊ लागला आणि तिथेच तो क्षणोक्षणी जूना होऊ लागला .प्रगतीचा महामेरू होण्यात स्पर्धा करू लागला .बेफाम ,बेदरकार ,अनिर्बंध ,निराकार बनू लागला .लोकोपयोगी होण्याच्या नादात इतका गुरफटला कि ,माणूस एक सजीव प्राणी च आहे हे च विसरू लागला आणि अहं वादी बनला .सजीव असूनही दगडाचा झाला .निराकार ,निर्मिक म्हणू लागला .विविध सत्तांना आदर्श माणू लागला .विनाशकारी ताकद मिळवण्यात धन्य होऊ लागला .आकाशाचे पंख आता थिटे वाटू लागले ,अंतरीक्ष आता स्वप्न बनू लागले .माणूस आपले  निरागसपण कधीच हरवून बसला.यंत्र हे परिश्रम कमी करण्याचे केवळ एक मध्यम होय हा विचार किंवा यंत्राच्या निर्मितीचे उद्देशच त्याने मोडीत काढले .

                                                               पण ते म्हणतात न ,सतत जिंक्ण्यार्या राजाला मृत्युरूपी यम दिसतच नाही .यंत्र रुपी खेळणे आपले रक्षक हा ठाम विश्वास वाढू लागला .पण यासर्व क्षमताना कचकन ब्रेक लागला तो कोरोनाचा ..........आणि प्रगतीच्या विमानावर आरूढ झालेला माणूस क्षणात भानावर आला .काही त्रिकालाबाधित सत्ये तो स्वीकारू लागला .अनावश्यक गरजांनी वेढलेला माणूस अन्न ,वस्त्र ,निवारा या सत्याना सामोरा गेला .पोटाची छोटीशी खळगी महत्वाची वाटू लागली .आणि श्वासागणिक वाढणारे भय माणसाने अनुभवले ,प्रत्येक श्वासाचा आज तो हिशोब ठेऊ लागला .आणि माणूस असल्याची त्याची ओढ अधिकच गडद झाली .माणूस आज आपले भय आपले हत्यार म्हणून वापरत आहे .आज तो बिच्चारा म्हणजे अगदी बिच्चारा झाला आहे .अवघ्या जगाला एकाच मानसिकतेने ग्रासले .....आणि ते म्हणजे श्वासाची किंमत .आज अगदी अगतिक झालाय माणूस .त्याने लावलेले शोध आज निश्चल उभे आहेत ...त्यांच्या कदाचित गावीही नसेन कि माणूस टरकला,कुटुंब ,मुले,आईबाप ,मित्र याच्या असण्या नसण्याने आज माणसाला फरक पडू लागला ,असे म्हणता येईल का कि माणूस परत आला .जीवन थांबल्याने सगळ थांबत नाही हे कळले .

                                                            मानवी भावबंध एकाच कुटुंबात पुन्हा नव्याने जुळू लागले .कधी कधी असे वाटते ,ही सक्तीची सुटी मिळण्याआधी च एक निखळ सुटी  स्वतासाठी माणसाने घ्यायला हवी होती.मरण स्वस्त होण्याआधीच किमती जीवन भरपेट जगायला हवे होते .मरण हे अंतिम सत्य असले तरी ते भेसूर ,पोरके ,विषन्न नको होते .हवातला गारवा ,कुटुंबातील उब ,आसमंतातील रंग ,प्रेमाचा सोनेरी क्षण खूप खूप जागून ,पिऊन घ्यायला हवा होता .कोरोनाने काय गमावले हे सर्वच जाणतात पण कमावले काय तर ,जगण्यासाठी भय हवे ,आपल्या माण सां साठी  भय हवे.मरणाआ धीच्या जीवनासाठी भय हवे   . 

                                                                                                                  क्रमशः .    

Comments

Post a Comment