सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन .
जि
.प.प्रा .शाळा नायगाव जुने येथे पहिला महिला शिक्षण दिन व सावित्रीबाई फुले जयंती
दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली .याप्रसंगी शाळेचे
मुख्याध्यापक श्री .संतोष नामदेव वाघमोडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली
.तसेच शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी व शिक्षक यांचे
हस्ते करण्यात आले .
श्री
.वाघमोडे यांनी सावित्रीबाई फुले यांचे सविस्तर जीवनकार्य विषद केले .या कार्यात सावित्रीबाई ना ज्योतिबा फुले यांचे लाभलेले
अनमोल असे पाठबळ मिळाले याची माहिती दिली
.महिला शिक्षण दिन या सोहळ्यात शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका श्रीमती .सुजाता
लक्ष्मण सोळसे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ,मुंबई यांचा राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षक रत्न
पुरस्कार २०२० मिळाल्याबद्दल शा ळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .श्रीमती
.सोळसे यांनी सावित्री बाईंचे सामाजिक भान व द्र्ष्ठे पनाबद्दल माहिती दिली .
नवीन वर्ष व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त
शिक्षक वर्ग यांचे कडून मुला खाऊ व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले .

Comments
Post a Comment